वेडा विकास आम्हाला नको - उद्धव ठाकरे

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई - हा कसला विकास, असा प्रश्‍न करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'असला वेडा विकास आम्हाला नको. माझे मंत्री काम करतात. मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या प्रतिनिधींना झोप येत नाही,'' असे सांगत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली.

मुंबई - हा कसला विकास, असा प्रश्‍न करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'असला वेडा विकास आम्हाला नको. माझे मंत्री काम करतात. मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या प्रतिनिधींना झोप येत नाही,'' असे सांगत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली.

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भेट देत मानधन वाढीसाठी झटणाऱ्या सेविकांना पाठिंबा दिला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. गुजरातमध्ये कॉंग्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जनतेने "हा कसला विकास,' असा प्रश्‍न उपस्थित केला होता. तोच धागा पकडला. या वेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत उपस्थित होते.

मानधन वाढवले, चर्चेला यावे - पंकजा मुंडे
'अंगणवाडी सेविकांच्या मानधनात माझ्या कार्यकाळात मी दोनदा वाढ केली आहे. या वेळीही सरकार आर्थिक अडचणींचा सामना करीत असताना मानधन पाच हजार रुपयांवरून साडेसहा हजारांवर नेले आहे.

या सेविकांच्या प्रश्‍नांबाबत आम्ही संवेदनशील आहोत. भाऊबीज मदतीतही वाढ केली आहे. या निर्णयांमुळे सरकारवर 370 कोटींचा बोजा पडला आहे. अंगणवाडी सेविकांनी आता या विषयाचे महत्त्व लक्षात घेता कामावर रुजू व्हावे आणि बालकांचे जीव वाचवावेत,'' असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. "सकाळ'शी बोलताना त्या म्हणाल्या, की या विषयावर आम्ही कमालीचे गंभीर आहोत. या पुढे वेतनवाढ द्यायची असेल तर त्यासंबंधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आम्ही चर्चा करू. पण आता फार न ताणता सेविकांनी कामावर रुजू होणे आवश्‍यक आहे.

संबंधित बातम्या